वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथे जनउत्कर्ष ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्यावतीने स्व. शिवाजीराव देशमुख सभागृहात पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण हारूगडे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने आणि भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंटपदी ऋग्वेद खांडेकर याची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शांताराम जाधव होते.
यावेळी श्रीकृष्ण हारूगडे म्हणाले, एन. सी. सी .मुळे खाकी वर्दीचे आकर्षण होते.खेळामुळे मला नोकरीची संधी मिळाली.त्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा केली. चांगले यश मिळवण्यासाठी त्याग करावाच लागतो.सेवा बजावत असताना माझ्या हातून निष्कलंकपणे झालेली सेवा हाच माझ्यासाठी अनमोल ठेवा व आयुष्याची शिदोरी आहे.
ऋग्वेद खांडेकर म्हणाले,अपयश पचवून पुढे यायला पाहिजे.पदवी पर्यंत अपयश माहित नव्हते. स्पर्धा परीक्षेत उतरल्यावर अनेकवेळा दोन हजार किलोमीटर जाऊन ही अपयश येत होतं . त्यावेळी मन निराश व्हायचं .काहीवेळा आपला मार्ग चुकतोय की काय असे वाटत होते. १५ वेळा मुलाखतीत पाच सहा मार्कांनी अपयश आले तरी खचले नाहीत. घरातून मला आई वडिलांची खंबीर साथ मिळत होती. मी अपयशी होत नसून नेहमी यशच्या जवळ पोहचत असल्याची ते जाणीव करून देत होते.त्यामुळे मी खचून न जाता पुन्हा जोमाने घरात राहून अभ्यास करत होतो.अखेर आई वडिलांचा शब्द खरा ठरला मी मला हव्या त्या क्षेत्रात यश मिळवण्यात यशस्वी झालो.
यावेळी सहदेव खोत,प्रदीप गायकवाड ,अंजना खांडेकर,डॉ.ऐश्वर्या पाटील,विष्णू सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक के.वाय.भाष्टे यांनी केले.यावेळी हेमाताई हारुगडे,सुखदेव गुरव, संचालक आनंदराव जाधव,शिवाजीराव चौगुले,रघुनाथ धुमाळ, अशोक काटकर,तानाजी शिंदे, राजाराम मस्के,सल्लागार किशोर डिसले, ज्ञानदेव पाटील,अशोक खोत,चिंतामणी खांडेकर,अधिकाराव डंगारणे ,राजेंद्र कुंभार,अर्जुन पाटील, बाजीराव पाटील, दिलीप शिंदे उपस्थित होते.आभार उपाध्यक्ष विष्णू सावंत यांनी मानले.
0 Comments